if congress become in power wet will be change gst | Sarkarnama

कॉंग्रेस सत्तेवर आल्यास "जीएसटी' बदलू : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

चित्रकूट (मध्य प्रदेश) : कॉंग्रेस सत्तेवर आल्यास वस्तू व सेवा करात (जीएसटी) बदल करण्यात येईल, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. 

मध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी आज दोन दिवसांऱ्या दौऱ्यावर राज्यात आले आहेत. चित्रकूटमधील प्रसिद्ध कामतानाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभेत बोलताना राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी राहुल गांधी यांनी सोडली नाही.

 चौकीदारच चोरी करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. ""नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्‍सच्या (जीएसटी) माध्यमातून मोदी सरकार छोटे व्यवसाय आणि रोजगार नष्ट करीत आहे. आम्ही सत्तेवर आलो तर लगेचच "गब्बर सिंग टॅक्‍स'चे रूपांतर वास्तव करात करू. "कमी दरात एक कर' असे सूत्र आम्ही राबवू,'' असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले. 

"राफेल'च्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, की हिंदुस्तानच्या चौकीदारानेच चोरी केली आहे. जो माणूस देशाचा चौकीदार असल्याचा दावा करतो, तो स्वतःच राफेल करारातून उद्योजक अनिल अंबानी यांच्या खिशात 30 हजार कोटी भरत आहे. चौकीदाराने गरीब, युवक व अन्य लोकांच्या खिशातील पैशांनी अंबानी यांचा खिसा भरला आहे. 

संबंधित लेख