IED park in Nashik | Sarkarnama

स्फोटकांच्या अभ्यासासाठी नाशिकला "आयईडी" पार्क

संपत देवगिरे
सोमवार, 1 मे 2017

महाराष्ट्र पोलिसांचा या प्रकारचा पहिलाच उपक्रम असून नक्षलग्रस्त भागात काम करणा-या अधिकारी व पोलिसांना त्याचा चांगला उपयोग होणार आहे. त्यात अभ्यास, प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याचे शनिवारी राज्याचे पोलिस महासंचालक सतीष माथूर यांनी त्याचे उद्‌घाटन केले.

नाशिक - दहशतवादी, नक्षलवाद्यांकडून घातपाती कारवाया तसेच स्फोटांसाठी वापरण्यात येणा-या इम्पुव्हाईज्ड एक्‍सप्लोझीव्ह डिवायासेस म्हणजेच आयईडी अभ्यास नसल्याने अनेकदा पोलिस तसेच बाँब शोधक पथकाच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागतात. नागरिकांनाही त्याबाबत फारसी माहिती नसल्याने दहशतवादी कटात त्याचा वापर वाढत आहे. त्यादृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण मिळावे, अन्य विभागातील पोलिसांनाही त्याची माहिती व्हावी यासाठी येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये  'आयईडी' पार्क उभारण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिसांचा या प्रकारचा पहिलाच उपक्रम असून नक्षलग्रस्त भागात काम करणा-या अधिकारी व पोलिसांना त्याचा चांगला उपयोग होणार आहे. त्यात अभ्यास, प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याचे शनिवारी राज्याचे पोलिस महासंचालक सतीष माथूर यांनी त्याचे उद्‌घाटन केले.
 
देशविरोधी कारवाय करत असताना दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्याकडून 'आईडी'चा वापर केला जातो. या प्रकारे हल्ला करून आतापर्यंत अनेक जवान आणि पोलिसांचा तसेच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इम्पुव्हाईज्ड एक्‍सप्लोझीव्ह डिवायासेसची संपूर्ण माहिती, ते बाद कसे करावेत, यासंबंधीचे सर्व अत्याधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि माहिती आयईडी विभागाच्या माध्यामातून पोलिस आधिकाऱ्यांना मिळणार आहे. ड्रील नर्सरी या अभ्यासक्रमाचेही यावेळी उद्‌घाटन करण्यात आले आहे. पोलिस दलामधील कवायतीचे महत्व पटविण्यासाठी तसेच त्यामधील चुका टाळल्या जाव्यात यासाठी हा महत्वाचा उपक्रम आहे.

 

संबंधित लेख