IAS केंद्रेकर : मला "माननीय' म्हणू नका ! 

आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे लोकप्रिय असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आपल्या नावापुढे सरंजामदारी संज्ञा वापरु नयेत, यासाठी परीपत्रक काढले आहे.
IAS केंद्रेकर : मला "माननीय' म्हणू नका ! 
IAS केंद्रेकर : मला "माननीय' म्हणू नका ! 

पुणे: आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे लोकप्रिय असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आपल्या नावापुढे सरंजामदारी संज्ञा वापरु नयेत, यासाठी परीपत्रक काढले आहे. 

केंद्रेकर सद्या पुण्यात कृषी आयुक्‍त पदावर आहेत. पत्रव्यवहार, संचिका आणि मोबाईल संदेशामध्ये इतर अधिकाऱ्यांप्रमाणे केंद्रेकर यांच्या नावासमोर माननीय, सर अशा संज्ञा वापरल्या जात होत्या. त्यांनी ही पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सरंजामी स्वरुपाच्या संज्ञा यापुढे वापरु नयेत, यासाठी त्यांनी परिपत्रक काढले आहे. केवळ नाव अथवा पदनामाचा उल्लेख करावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

केंद्रेकर यांची कारकीर्द वादळी आहे. लोकांत मिसळून काम करणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, अशी भूमिका घेत त्यांनी अधिकारपदामुळे मिळणारी "विशेष प्रतिष्ठा' नाकारण्याचे धाडस दाखवले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com