जिल्हा अधिकारी जेव्हा पुरग्रस्तांसाठी पोती खांद्यावर घेतात

जिल्हा अधिकारी जेव्हा पुरग्रस्तांसाठी पोती खांद्यावर घेतात

मुंबई : केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाला जगभरातून मदत होत असताना ही मदत पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासत असताना आपल्या आयएएसला थोडे बाजूला ठेवून भरलेली पोती स्वत:च्या खांद्यावर घेतली. पुरग्रस्तांच्या मदतीला धावले. सोशल मिडीयावर या दोन आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

एका मराठमोळ्या लेफ्टनंट कमांडरने जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टर एका घराच्या छतावर उतरवून 23 जणांचे प्राण वाचविल्याची घटना ताजीच असताना आता या आयएएस अधिकाऱ्यांनीही माणूसकी दाखविली. वायनाडचे जिल्हाधिकारी जी. राजामनी कियम आणि उपजिल्हाधिकारी एन. एस. के. उमेश यांनी आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत तांदळाच्या गोण्या पाठीवरून उचलून कार्यालयामध्ये ठेवल्या. 

इदुक्की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जीवन बाबू हे कॅंपमध्ये लोकांना जेवण वाढत आहेत. तर केरळच्या आपत्ती निवारण खात्याच्या अधिकारी अंजली रवी या त्यांच्या लग्नाची तयारी सोडून पूरग्रस्तांची मदत करत आहेत. अंजली यांचे लग्न गेल्या शनिवारी होणार होते. केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र राबत आहेत. मात्र, पूर संकटच एवढे मोठे आहे की, राज्याचा कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो आयएएस असोसिएशनने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. देशभरातून या दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतूक होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com