निवडणूकीपुर्वी 18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणूकीपुर्वी 18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : आगामी लोकसभेची आचारसंहिता काही दिवसांवर येवून ठेपलेली असताना आज राज्य सरकराने 18 सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. 
निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित आणि बदली पात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार या बदल्या झाल्या आहेत. 

यामधे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्यात परतलेल्या सोनिया सेठी यांची अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए मुंबई येथे नियुक्ती केली असून या ठिकाणी असलेले प्रवीण दराडे यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.

नियुक्तीसाठी प्रतीकक्षेत असलेले ए बी सुभेदार यांची सह सचिव नगर विकास विभाग मंत्रालय येथे नियुक्ती दिली असून बी.जी.पवार यांची वसई विरार मनपा आयुक्त पदावर बदली केली आहे.नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले नितीन पाटील यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे बदली केली आहे. 

नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांची कोल्हापूर मनपा आयुक्त पदावर नियुक्ती केली असून अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची जिल्हाधिकारी नंदुरबार येथे नियुक्ती केली आहे. 

वर्धा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांची यवतमाळ जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.या ठिकाणी असलेले राजेश देशमुख यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एस.पापळकर यांची अकोला जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली असून याठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून असलेले आस्तिक पांडे यांनी बीड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. 

बीड जिल्हाधिकारी पदावर असलेले एम देवेंद्र कुमार सिंग यांची संचालक आयटी विभाग मंत्रालय येथे नियुक्ती केली असून डी. बी. हळदे व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम यांना रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती दिली आहे. कोकण विभागिय अतिरिक्त आयुक्त एच.एस. सोनवणे यांनी ठाणे जिल्हापरिषद सीईओ या पदावर नियुक्ती केली असून कोल्हापूर मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. 
लातूर मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची संचालक भूजल सर्वेक्षण विकास प्राधिकरण पुणे येथे तर संचालक मार्केटिंग पुणे येथे असलेले डी. आर.टावरे यांची सोलापूर मनपा आयुक्त या पदावर आणि व्ही.बी. पवार यांची सहसचिव स्किल डेव्हलपमेंट विभाग मंत्रालय येथे नियुक्ती केली आहे. 

तब्बल चार वर्षानंतर राज्य सरकारने पर्यटन संचालक पदावर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 
दिलीप गावडे हे सनदी अधिकारी आता पर्यटन संचालक म्हणून काम पाहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com