i will shutout intaluctul persons bjp mla | Sarkarnama

... तर बुद्धिजीवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजप आमदाराची मुक्ताफळे 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

बंगळूर : बुद्धिजीवींमुळेच आमचा देश खराब होत आहे. मी राज्याचा गृहमंत्री राहिलो असतो तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला असता, असे वादग्रस्त वक्तव्य विजापूर येथील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केले. 

विजापूर येथे आयोजित केलेल्या 19 व्या कारगिल विजयोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की देशद्रोही संघटनांमुळे आमच्या देशाचे नुकसान होत आहे. राजकारणी लोक देशविरोधी कार्य करीत आहेत. जवान 60 अंश तापमानातही काम करीत असतात; परंतु आम्हाला तीन किलोमीटर चालत जाता येत नाही, अशी आमच्या देशाची स्थिती आहे. 

भाषणात कॉंग्रेस व बुद्धिजीवींविरुद्ध टीका करताना पाटील-यत्नाळ म्हणाले, की काश्‍मीरमधील लोकही देशाविरुद्ध घोषणा देत असतात. तरीही अशा लोकांना देशातील काही लोक पाठिंबा देतात. आमच्या देशांच्या सीमांचे, देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याबद्दलही ते अवमानकारक वक्तव्य करतात, ही शोकांतिका आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख