पंचवीस वर्ष बाळासाहेबांसोबत राहिलो, आता पडद्यावर 'ठाकरे' पाहणार- छगन भुजबळ 

आपल्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्ष शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर 'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण 'ठाकरे' पाहणार असल्याचे सांगितले.
पंचवीस वर्ष बाळासाहेबांसोबत राहिलो, आता पडद्यावर 'ठाकरे' पाहणार- छगन भुजबळ 

औरंगाबाद : शिवसेनेत असतांना पंचवीस वर्ष बाळासाहेबांना मी जवळून पाहिलंय, त्यांच्या सोबत राहिलोय. आता त्यांच्या जीवनावर 'ठाकरे' चित्रपट येतोय, यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी वठवली हे पाहण्याची उत्सूकता आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रा आणि इतर कार्यक्रमातून सवड काढून 'ठाकरे' पाहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी येथे सांगितले. 

आपल्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्ष शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर 'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण 'ठाकरे' पाहणार असल्याचे सांगितले. 

भुजबळ म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय जीवन, शिवसेनेच्या उभारणी दरम्यान झालेली आंदोलन, प्रसंग एका चित्रपटात दाखवण शक्‍य नाही. त्यामुळे या चित्रपटात नेमके कोणते प्रसंग दाखवले गेले, नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी साकारली हे मला पहायचंय." बाळासाहेबांना तुम्ही अटक केली, तो प्रसंग यात असेल का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "मला माहित नाही. पण मी गृहमंत्री असतांना त्या काळातल्या ज्या फाईली पोलीसांनी माझ्यासमोर कारवाईसाठी ठेवल्या होत्या, त्यापैकीच एक बाळासाहेबांची फाईल होती, त्यामुळे सगळ्याच फायलींवर मी सह्या केल्या होत्या. बाळासाहेब आणि माझ्यात त्यानंतर शाब्दिक युध्द देखील झाले होते." पण नंतरच्या भेटी आणि चर्चेने आमच्यातील कटुता नाहीसी झाली होती,अशी आठवणही छगन भुजबळांनी सांगितली. 

''शिवसेनेत असतांना बेळगांवच्या आंदोलनात मी वेश बदलून सीमाभागात घुसलो होतो. अटक झाली, जेलमध्ये गेलो, डोक फुटलं. मुंबईत दाक्षिणात्यांच्या विरोधात उभारलेले आंदोलन 'बजाव पुंगी, हटाव लुंगी'चा नारा हा त्याकाळातील परिस्थीतीनुसार होता. त्यामुळे हा प्रसंग चित्रपटात घेतला असावा किंवा नाही, त्याबद्दल मी अधिक काही सांगू शकत नाही," असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com