i will never insult modi`s father : Rahul Gandhi | Sarkarnama

मी कधीही मोदींच्या आईवडिलांचा अनादर करणार नाही : राहुल गांधी

पीटीआय
बुधवार, 15 मे 2019

नवी दिल्ली : पंतप्रधानांनी माझ्या कुटुंबीयांचा कितीही अपमान केला तरी, मी आयुष्यभर त्यांच्या आई-वडिलांचा कधीही अनादर करणार नाही, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील नीमच, उज्जैनच्या तराना आणि खांडवा लोकसभा मतदारसंघांत कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

राहुल म्हणाले, की नरेंद्र मोदी हे आमच्याविषयी द्वेषाने बोलतात, माझ्या वडिलांचा अपमान करतात, आजी, पणजोबा यांच्याबद्दल बोलतात, मात्र आम्ही कधीही नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलणार नाही. मी मरेन, पण नरेंद्र मोदींच्या माता-पित्यांचा अपमान करणार नाही. मी संघाचा माणूस नाही, भाजपचा माणूस नाही, मी कॉंग्रेस पक्षाचा व्यक्ती आहे. आपण जेवढ्या प्रमाणात द्वेषांनी आमच्याशी बोलाल तेवढ्याच प्रमाणात आम्ही प्रेम देऊ. गळाभेट घेऊन प्रेम करू. प्रेमाने नरेंद्र मोदी यांना पराभूत करू. त्यांना आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रेमाने पराभूत केले आहे आणि आताही पराभूत करू.

कॉंग्रेस सरकारने सर्वांचे कर्ज माफ केले. आम्ही सर्वांवर प्रेम करतो, मग तो भाजपचा का असेना. तुम्ही कॉंग्रेसचे मन पाहा. नरेंद्र मोदी यांची छाती 56 इंचाची आहे, तर कॉंग्रेसचे मन 56 इंचाचे आहे, असेही राहुल म्हणाले. 

संबंधित लेख