i will must give water to punekar mp shirole | Sarkarnama

त्रुटी दूर करून पुण्याला पुरेसे पाणी देणारच ! खासदार शिरोळेंचा निर्धार

उमेश घोंगडे 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे : पुण्याच्या पाणी पुरवठ्यात सध्या काही अडथळे असले तरी त्यातील त्रुटी दूर करून पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्‍वासन खासदार अनिल शिरोळे यांनी आज दिले. 

पाटबंधारे खात्याने पुण्याच्या पाणी पुरवठ्यात कपात केल्याने गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. शहराच्या पूर्व भागात तसेच मध्यवर्ती पेठांच्या भागाला याचा फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन दिवसात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पक्षाचे सारे नेते गप्प असताना खासदार शिरोळे यांनी पुरेसे पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

पाणी पुरवठ्यात झालेला गोंधळ आणि सत्ताधारी भाजपाने याकडे केलेली डोळेझाक यामुळे पुणेकरांमध्ये असंतोषाची भावना आहे. गेल्या तीन दिवसात पक्षाकडून आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पुणेकरांच्या पाण्यात कपात करणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. मात्र त्यांच्या परस्पर पाणी कपात करण्यात आली. त्यानंतर गेल्या तीन दिवसात पालकमंत्री या विषयावर बोललेले नाहीत. 

मध्यवर्ती पेठा, शहराचा पूर्व भाग तसेच शिवाजीनगर व मॉडेल कॉलनी या परिसरातील अनेक सोसायट्यांत टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे टॅंकरने पाणी मिळविण्यासाठी नागरीकांना महापालिकेकडे पाठपुरावा करूनही वेळेवर टॅंकर मिळत नाहीत. सोसायट्यांना वैयक्तिक पातळीवर पैसे भरून पाणी मिळविण्याची वेळ आली आहे. 

पाणी पुरवठा विस्कळित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन काही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते. पाण्याची नेमकी स्थिती व कपातीबाबत पुणेकरांपर्यंत थेट भूमिका सांगालयला हवी होती. मात्र गेल्या तीन दिवसात यातील काहीच झालेले नाही. पक्ष शिस्तीच्या नावाखाली पक्षातील इतर कुणी यावर बोलायला तयार नाही. पाणी पुरवठ्यात सुधारणा नक्की कधी होणार, पूर्व भागाला पुरेसे पाणी मिळण्यासाठी काय करणार यावर कुणीच उत्तर देत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

संबंधित लेख