i will fight in madha dipak salunkhe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

प्रभाकर देशमुख राजकीयदृष्ट्या नवखेच : दीपक साळुंखे 

प्रमोद बोडके 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

सोलापूर : माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे आमचे नेते आहेत. परंतु येत्या लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवायला मी देखील इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगितले. 

सोलापूर : माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे आमचे नेते आहेत. परंतु येत्या लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवायला मी देखील इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगितले. 

खासदार मोहिते-पाटील यांनी चांगले काम केले आहे. माढा मतदार संघातील उपसा सिंचन योजना, शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न आपण भविष्यात सोडवू असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे खासदार निवडून आले ते स्वत:च्या जिवावर नाही तर पक्षातील कार्यकर्त्यांच्या जिवावर आले असल्याचीही आठवण साळुंखे यांनी करून दिली. 

येत्या लोकसभा निवडणुकीत जर इव्हीएमवर निवडणूका घेतल्या नाहीत तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला 48 पैकी 40 जागांवर निश्‍चित विजय मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे देखील माढ्यातून राष्ट्रवादीतर्फे इच्छुक आहेत. देशमुख हे प्रशासकीयदृष्ट्या जरी जुने असले तरीही राजकीयदृष्ट्या नवखेच असल्याची माहितीही साळुंखे यांनी दिली. 

माढा, करमाळा, सांगोल्याची भूमिका पवारांना सांगणार 
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत माढा, करमाळा व सांगोला विधानसभा मतदार संघातील नेत्यांनी आपली भूमिका नंतर स्वतंत्रपणे भेटून सांगणार असल्याचे खासदार पवार यांना सांगितले आहे. खासदार पवार सध्या परदेशात आहेत. दरम्यानच्या कालावधीत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून खासदार पवार यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले. 

संबंधित लेख