i will contest from Baramati : Jankar | Sarkarnama

बारामतीचा उमेदवार मी असेन आणि मीच जिंकणार : जानकर

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जून 2018

बारामती : "राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. मात्र, बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,'' असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला. 

बारामती : "राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. मात्र, बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,'' असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला. 

जानकर यांनी दिवंगत पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर माहिती दिली. "बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही मागणार आहोत. मागील लोकसभेच्या वेळीच मला माढा मतदारसंघ हवा होता. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या पक्षाचे हित समोर ठेवून षड्‌यंत्र केले व त्यांच्याकडे तो मतदारसंघ घेतला,'' असे त्यांनी सांगितले. "मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी कोठूनही लढू शकतो. बारामतीतूनच लढण्याला प्राधान्य असेल,`` असे त्यांनी स्पष्ट केले. 

जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना टक्कर दिली होती. ही निवडणूक तेव्हा देशात चर्चेची राहिली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांचा या मतदारसंघाशी संपर्क नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आता जानकर यांनी पुन्हा बारामतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने नव्या चर्चेला सुरवात होणार आहे.

पत्रकारांनी त्या या वेळी धनगर आरक्षणा संदर्भात प्रश्न विचारले. ते म्हणाले, ``यासाठी कमिटी नेमली आहे. तिचा अहवाल सकारात्मक येईल, तेव्हा सरकार निश्‍चित आरक्षण लागू करेल. केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा तरुणांना असली तरी केवळ आरक्षण - आरक्षण म्हणून चालणार नाही. आम्ही सत्तेत आलो, ते काही एकट्या समाजाच्या बळावर नाही. जर कोणी केवळ आरक्षणामुळे महादेव जानकर सत्तेपर्यंत पोचले असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांबाबत राग असू शकतो. मात्र, आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला शिकावे.``

संबंधित लेख