i wil campaign against shetty : Jankar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

राजू शेट्टी माझे मित्र पण त्यांच्याविरोधात प्रचार करणार : महादेव जानकर

राजू सोनवणे
शुक्रवार, 15 मार्च 2019

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या रासपला लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीने मानाचे स्थान दिले नसले तरी आपण युतीसोबतच जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : सुजय विखे हा एसीमध्ये बसणारा नाही. तर फिल्डवरील कार्यकर्ता आहे, अशा शब्दांत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी त्यांचे कौतुक केले.

विखे यांनी आज महादेव जानकर यांच्यासह ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

या भेटीनंतर बोलताना जानकर यांनी विखे यांचे कौतुक केले. विखे यांना त्यांच्या काॅंग्रेस पक्षात न्याय मिळत नसेल तर त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याचा अधिकार आहे. तो त्यांनी बजावल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

मोठे पक्ष हे छोट्या पक्षांना गिळण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे छोट्या पक्षांच्या नेत्यांना नेहमी स्वाभिमान जागृत ठेवाव लागतो, असे स्पष्ट करत आपण शिवसेना आणि भाजपच्या युतीसोबतच  जाणार असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. खासदार राजू शेट्टी हे माझे मित्र असले तरी त्यांच्याविरोधात मी हातकणंगले येथे प्रचार करणार आहे. तेथे मी भाजपला मदत करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. मात्र त्यांचा करिश्मा आता राहिलेला नाही, असाही दावा त्यांनी केला. पवार यांना लोकांकडून  रिपोर्ट आला म्हणून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. लोकांच्या मनात काय चालले आहे, ते चांगले समजतात. जर पवार माढ्यातून उभे राहणार असतील तर मी त्याच ठिकाणाहून लढेल, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. आमचा जन्म हा पवार यांच्या विरोधातच झाला, हे त्यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख