मी राजू शेट्टींच्या शाळेत होतो..त्यामुळे त्यांच्या `शाळा` मला माहिती : खोत यांचा टोला

ऊस आंदोलनाचा विषय तापू लागला कीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी या दोघांतील वादही चिघळतो...
मी राजू शेट्टींच्या शाळेत होतो..त्यामुळे त्यांच्या `शाळा` मला माहिती : खोत यांचा टोला

माजगाव : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखानदार व खासदार संघटनेचे मॅच फिक्सिंग आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा असा आरोप करत शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासहित देण्यास भाग पाडू, शेतकऱ्यांनी त्याची चिंता करू नये, असा दिलासा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

आळवे (ता. पन्हाळा) येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उत्रे,व आळवे गावातील विविध विकासकामाचे उद्धघाटन खोत यांच्या हस्ते झाले. खोत यांच्या दौर्‍याने या भागातील अनेक कामांना चालना मिळाली. यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे सभापती अनिल कंदूरकर प्रमुख उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपीच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच खोत यांच्यावरही टीका केली होती. या टिकेला खोत यांनी उत्तर दिले. 

खोत पुढे म्हणाले की जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी आहेत पण केंद्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यास मोठी मदत केली आहे. पण निवडणुका तोंडावर ठेऊन काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

शिरोळ तालुक्यात मोठी गंमत असल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. आपल्या कार्यकर्त्यांनी अगोदर ऊस घालण्यास सांगून दोन- तीन महिन्यांनंतर आता त्यांना आंदोलन सुचले आहे. मी गेली १५ वर्षे त्याच शाळेत होतो. त्यामुळे त्यांच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत, असा आरोप त्यांनी केला.  कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा असे त्यांनी सूचित केले. तसेच शेतकऱ्यांना उर्वरित 20 टक्के रक्कम व्याजासहित द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी पंचायत समिती उपसभापती संजय माने, जि. प. सदस्य शंकर काशिद, माजी पंचायत समिती सभापती पृथ्वीराज सरनोबत, बाजार समिती संचालक उत्तम धुमाळ, प्राचार्य एन्. डी. चौगले, सरपंच रंगुताई मगर, युवराज गायकवाड, भिमराव पाटील, शिवाजी बंगे, धर्मराज खामकर आदीसह परिसरातील गावाचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com