i m shisainik, dilip lande mumbai | Sarkarnama

आम्ही शिवसैनिकच; आता 'मनसैनिक' होणार नाही : दिलीप लांडे 

सुचिता रहाटे 
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई : आम्ही 'शिवसैनिक' झालो...आता 'मनसैनिक' होणार नाही. आम्ही राज ठाकरेच काय कोणत्याही मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीहीबोललेलो नाही. आम्ही पुन्हा मनसेत येऊ ही बातमी सपशेल खोटी आहे असे मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

मनसेतून शिवसेनेत गेलेले दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे हे मनसेत पुन्हा दाखल होणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत लांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ही माहिती खोटी आहे. आम्ही राज ठाकरे यांना शिवसैनिक झाल्यापासून भेटलोच नाही. तसेच, ही खोटी माहिती मनसेच्याच कार्यकर्त्यांनी पसरवली असून आमच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

याबाबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अजूनतरी हे चारही नगरसेवक आमच्या पर्यंत पोहचलेले नाहीत, ते मनसेत पुन्हा येत आहेत ही माहिती सुद्धा मला माध्यमांकडून मिळत आहेत. तसेच हे चारही नगरसेवक राज ठाकरे यांना भेटले नाहीत. ते पुन्हा मनसेत येणार असतील तर आम्ही समोरून माध्यमांना कळवू. 

संबंधित लेख