कॉंग्रेसच्या वाटेवरून परत आलोय :खडसे 

eknath-khadse
eknath-khadse

जळगाव  : "सन 1980 मध्ये जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसचे खासदार, आमदार व मंत्री होत. त्यावेळी प्रयत्न करूनही भाजपला यश मिळत नव्हते. तत्कालीन मंत्री (कै.)मधुकरराव चौधरी यांनी काय "भाजीपाला'पक्षात राहतो,इकडे ये असे डिवचलेही होते. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा विचार झाला होता. परंतु (स्व.)चंद्रकांत मेंडकी यांनी आपले विचार बदलविले त्यामुळे आजही भाजपमध्येच आहोत. अन्यथा आपली वाट चुकली असती ",  असे मत राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव येथे ते एका कार्यक्रमात होते. भाजपचे जेष्ठ नेते (कै,)चंद्रकांत मेडकी यांच्या स्मरणार्थ रस्त्याचे नामकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी महसूलमंत्री चंद्रकात पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. माजी खासदार डॉ,गुणवंतराव सरोदे पक्षाचे अध्यक्ष होते. 

यावेळी बोलतांना खडसे म्हणाले," भाजप वाढविण्यासाठी आपण काम करीत होतो, त्यावेळी जिल्ह्यात सर्व काही कॉंग्रेसकडेच होते. कॉंग्रेसचे आमदार,खासदार, मंत्री, असा मोठा लवाजामा होता. परंतु भाजपचे काहीच नव्हते. त्यावेळी भाजपला हे कधी मिळणार असे वाटयाचे. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते (कै.)मधुकरराव चौधरी यांनी आपल्याला कॉंग्रेसमध्ये येण्याबाबतही सूचविले होते. आपल्यालाही जावे असे मनात आलेच होते.

आपण भाजपचे जेष्ठ नेते (स्व.)चंद्रकांत मेंडकी यांच्याकडे हा विचारही बोलून दाखविला, त्यावेळी ते म्हणाले, तुझ्या डोक्‍यात घुसलेला हा विचार काढून टाक . आपला पक्षही मोठा होईलच. फक्त कार्य कर. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण पक्षात काम करीत राहिलो पक्ष वाढविला. अन्यथा आपणही वाट चुकलो असतो आणि कॉंग्रेसच्या वाटेवर गेलो असतो. परंतु केवळ चांगल्या मार्गदर्शनामुळे आपण चुकलो नाही. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com