I have not decided party yet : Dhanjay Mahadik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

लोकसभा कोणत्या पक्षातून लढवणार हे अजून नक्की नाही  : धनंजय महाडिक 

सरकारनामा
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

ज्या मागे कोणी नाही, तो महाडिकांना हद्दपार करा म्हणतो. महाडिक जेवढे जमिनीवर आहेत, तेवढेच ते जमिनीखाली आहेत. आमची मुळे घट्ट आहेत.

-धनंजय महाडिक

कोल्हापूर : " माझ्याच  पक्षातील नेते माझ्या उमेदवारीला विरोध करतात. जो महापालिकेला पडला, तो माझ्या उमेदवारीला विरोध करतो. ज्यामागे कोणच नाही, तो महाडिकांना हद्दपार करण्याची भाषा करतो. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार हे नक्की नाही; मात्र खासदार मीच असणार, "असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

धनंजय महाडिक युवा शक्तीचे शहराध्यक्ष रहिम सनदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.राजारामपुरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात सलग दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार महाडिक यांचा ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.

 सत्कारानंतर महाडिक म्हणाले, "संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्‍न मांडणारा खासदार म्हणून माझा लौकिक आहे. म्हणूनच देशातील 588 खासदारांमधून संसदरत्न पुरस्कारासाठी माझी निवड झाली; पण माझ्याच पक्षातील नेते मला विरोध करतात. जो महापालिकेच्या निवडणुकीत पडला, तो लोकसभेला मला उमेदवारी देऊ नका म्हणतो."

" ज्या मागे कोणी नाही, तो महाडिकांना हद्दपार करा म्हणतो. महाडिक जेवढे जमिनीवर आहेत, तेवढेच ते जमिनीखाली आहेत. आमची मुळे घट्ट आहेत. आम्हाला कोणी हद्दपार करू शकत नाही. त्यामुळे लोकसभेला कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची, हे अजून आम्ही नक्की केलेले नाही; मात्र 2019 ला खासदार मीच असणार. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. आपण अशी तयारी करायची की मला जेवढी मते मिळतील, त्याच्या निम्मी मतेही विरोधी उमेदवाराला मिळता कामा नयेत.''

संबंधित लेख