I Have an emotional attachment for this corporation : Narendra Patil | Sarkarnama

आण्णासाहेब पाटील महामंडळाशी माझे भावनिक नाते - नरेंद्र पाटील यांची भावना 

संजय मिस्कीन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

 . राज्यात चार कोटीहून अधिक  मराठा समाज

 . मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव 

 . आधुनिक व कौशल्य विकासवर भर 

 .  लाभार्थ्यांच्या निवडी पारदर्शकपणे
.  राजकारण नव्हे तर समाजकारण करणार 

मुंबई :" मराठा समाजाच्या आर्थिकउन्नतीसाठी माथाडी कामगार नेते स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांचे योगदान निर्विवाद आहे.त्यांच्याच नावानं सुरू असलेल्या आर्थिक विका समहामंडळाचे अध्यक्षपद हे माझ्यासाठी राजकिय-प्रशासकिय पद असले तरी त्याहून मोठं म्हणजे या महामंडळाशी माझे भावनिक बंध जोडलेले आहेत.,"  अशी भावना या महामंडळाचे नवनियुक्तअध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘सरकारनामा’शी संवादसाधताना व्यक्त केली.  

नरेंद्र पाटील म्हणाले ," मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी वडिलांनी दिलेल्या बलिदानाची मला जाणीव आहे. त्यामुळे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासमहामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एक समाजाचे कर्तव्य  म्हणून पार पाडेन . राजकारण नव्हे तर समाजकारण करण्यासाठीची ही संधी अाहे.  राज्यात चार कोटीहून अधिक  मराठा समाज आहे.या समाजाच्या व्यथा मी पाहिल्याच नाहीत तर जगलो देखील आहे. त्यामुळं महामंडळाचा अध्यक्षम्हणून नव्या आधुनिक संकल्पनांवर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील. "

" महामंडळाकडे सध्या तशा अर्थानं दुर्लक्षित म्हणून पाहिले जाते. यामधे सुसुत्रता व तंत्रज्ञानाच्या आधारे सामान्य गरजू पर्यंत योजना देण्यासाठीचा आराखडा तयार करून लाभार्थ्यांची अडवणूकहोणार नाही यावर संपुर्ण लक्ष राहिल," असे नरेंद्रपाटील म्हणाले. 

"आर्थिक कर्ज वाटपाची प्रकरणे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी यासाठी कौशल्य विकास व व्यावसायिकतेला प्राधान्य देतानाच लाभार्थ्यांच्या निवडी पारदर्शकपणे राबवल्या जातील.  लघु व्यवसाय त्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्याचा नविन प्रयोग करण्याचा माझा मानस आहे. राज्यभरात व्यक्तिगत लाभार्थ्यांसोबतच समुह विकासाने उद्योजक निर्मिती ही संकल्पना अंमलात अाणून अधिकातअधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करूनदिल्या जातील," असे पाटील म्हणाले. 

" महामंडळाकडे पांढरा हत्ती  म्हणून पाहिले जाते.मात्र या महामंडळाशी माझे नाते पुत्रत्वाच्या बंधनात अडकले असल्याने एक  मिशन म्हणून काम करण्यास मी कटिबध्द अाहे. समाजातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समस्यांवर कायमस्वरूपी उपययोजना करणं हे उध्दीष्ट समोर ठेवूनच कामकाज करेल,' अशी स्पष्ट भूमिका नरेंद्रपाटील यांनी यावेळी व्यक्त केली. 

संबंधित लेख