i became cm because vajpai says manohar joshi | Sarkarnama

 अटलजींमुळे मी मुख्यमंत्री बनलो : मनोहर जोशी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. या दोघांमध्ये हजरजवाबीपणा होता असे स्पष्ट करतानाच मी 1995 जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याचे श्रेय वाजपेयींनाही जाते अशी कबुली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज दिली. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोशी म्हणाले, की शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षाहून अधिक काळ युती टिकली ती वाजपेयी आणि बाळासाहेबांमुळे. हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. पण, युतीमध्ये कधी टोकाचे मतभेद बनले नाहीत. राज्यातून जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेलो तेव्हाही मंत्री, लोकसभेच्या सभापतीसह अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले. त्यावेळी वाजपेयी यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.  

संबंधित लेख