i and chavan should come together : Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र यायला हवे : शरद पवार

ज्ञानेश सावंत
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पुणे : राज्याचा गाडा रूळावर आणायाचा असेल आम्ही आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र यायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेससोबतच्या आघाडीची अपरिहार्यता व्यक्त केली.

पुणे : राज्याचा गाडा रूळावर आणायाचा असेल आम्ही आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र यायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेससोबतच्या आघाडीची अपरिहार्यता व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कै. सदू शिंदे मैदानाचे उदघाटन पवार आणि चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. सदू शिंदे हे पवार यांचे सासरे होत. पवार यांनी उदघाटनाच्या निमित्ताने चव्हाण यांना फिरकी गोलंदाजी केली. त्याचीही चर्चा या निमित्ताने झाली. पवार यांनी क्रिकेटविषयी आठवणी जागवल्या. त्यांनी राजकीय वक्तव्ये सूचकपणे केली. मात्र त्यावर फार काही बोलले नाहीत.

पवार यांनी सांगितले की पुणे शहर हे क्रिकेटसाठी एके काळी मार्गदर्शक होते. पुणेकरांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले. सदू शिंदे हे फिरकी गोलंदाज होते. त्यांच्यासारखी गोलंदाजी करण्याचा चंदू बोर्डे यांचा प्रयत्न होता, असे खुद्द बोर्डे यांनी लिहून ठेवले आहे. पण व्यक्तिगत जीवनात मीच शिंदे यांचा `विकेट` ठरलो, असे त्यांनी मिश्लिलपणे सांगितले.  माझ्या बारामती मतदारसंघातील चौधरवाडी येथील एक गृहस्थ मी सदू शिंदे यांचा जावई असल्याने मला आवर्जून मतदान करायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.

बीसीसीआय आणि आयसीसी या दोन्ही संघटनांवर काम करतानाचे अनुभव त्यांनी या वेळी सांगितले. क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा यामुळे करता आल्याचे त्यांनी सांगितले. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांच्या सल्ल्यानेच धोनकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपविली होती, असाही किस्सा त्यांनी सांगितला.  

संबंधित लेख