I am a small party worker can meet Amit Shaha - Sadabhau khot | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मी संघटनेचा छोटा कार्यकर्ता ;अमित शहांना भेटू शकतो - सदाभाऊ खोत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

इस्लामपूर :  ज्यांच्या डोक्‍यात नेतेपदाची हवा असते, त्यांना एखाद्याने बोलवल्यावर मान-अपमान वाटतो. मी राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा छोटा कार्यकर्ता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यात मला गैर वाटत नाही.

सरकारचा प्रतिनिधी, छोटा कार्यकर्ता म्हणून मी भेटू शकतो, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार बैठकीत व्यक्त केले. 

स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ते स्वतः अमित शहा यांना भेटू शकणार नाहीत. सदाभाऊ खोत सुद्धा "स्वाभिमानी'चे म्हणून शहा यांना भेटू शकत नाहीत, असे मत  व्यक्त केले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारताना खोत म्हणाले,""एखाद्याने भेटीला बोलवले तर जायला काय हरकत आहे. मला वेळ असेल तर व कुणी बोलावले तर मी मानसन्मान न घेता भेटीला जात असतो. त्यातच मी शेट्टी यांच्या भाषेत "स्वाभिमानी'चे जसे अनेक कायकर्ते आहेत तसा मीही छोटासा आहे."

 "मी कार्यकर्ता कोणताही मानापमान न मानता सतरंज्या उचलतो. पंक्तीत जेवायला वाढतो. एखादा कार्यक्रम चांगला वाटला तर त्या ठिकाणी न बोलवताही जातो. त्यात काही गैर वाटत नाही. डोक्‍यात नेतेपण घुसले की मानसन्मान आठवतो. माझ्या डोक्‍यात नेतेपण नसल्यामुळे मी कोणालाही भेटू शकतो व भेटणार. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील कार्यकर्ता असल्याचे शेट्टींनी घोषित केले आहे. त्यामुळे कार्यकर्ता व विद्यार्थी म्हणून रहायला आवडेल. शेट्टी यांचे नेतृत्व मानूनच आजपर्यंत काम केले. एकमेकांच्या भेटी घेणे गैर नाही. अनेक राजकीय पक्षाचे लोक वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना कामासंदर्भात भेटत असतात.'' 

संबंधित लेख