आमदार लग्नाची निमंत्रणे देत फिरतात, मी शेतकऱ्यांसाठी निमंत्रण देतोय : बच्चु कडू

''सध्या आमदार, खासदार आपल्या मुला- मुलींच्या लग्नाचे आमंत्रण देत फिरताना दिसतात. मी मात्र शेतकऱ्यांच्या मुला बाळांची लग्ने व्हावी, यासाठी त्यांचे संसार सुरक्षित व्हावेत, यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणुन तुम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे याचे आमंत्रण देत सगळीकडे फिरतो आहे. फरक लक्षात घ्या अन्‌ शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी साथ द्या," असे आवाहन आमदार बच्चु कडू यांनी केले.
आमदार लग्नाची निमंत्रणे देत फिरतात, मी शेतकऱ्यांसाठी निमंत्रण देतोय : बच्चु कडू

सटाणा : ''सध्या आमदार, खासदार आपल्या मुला- मुलींच्या लग्नाचे आमंत्रण देत फिरताना दिसतात. मी मात्र शेतकऱ्यांच्या मुला बाळांची लग्ने व्हावी, यासाठी त्यांचे संसार सुरक्षित व्हावेत, यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणुन तुम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे याचे आमंत्रण देत सगळीकडे फिरतो आहे. फरक लक्षात घ्या अन्‌ शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी साथ द्या," असे आवाहन आमदार बच्चु कडू यांनी केले.

येथील सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज प्रहार शेतकरी संघटनेतर्फे आमदार कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. त्याला मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे या मेळाव्याला स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसेना यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी कडू यांच्या व्यासपीठावर सहभागी झाले होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. यावेळी आमदार कडू म्हणाले की, आमदार, खासदार त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या पत्रीका वाटत फिरतात. मी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी तुम्हाला निमंत्रण देत भटकतो आहे.

ते पुढे म्हणाले, जीवनावश्‍यक यादीतुन कांद्याला वगळावे, कांद्याला किमान दोन हजार रूपये हमीभाव मिळावा या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी ज्या दिवशी रस्त्यावर ताकदीने उतरेल त्या दिवशी फक्त शेतकऱ्यांचेच राज्य असेल. त्याला कोणापुढे हाच पसरण्याची गरज राहणार नाही. याची जाणीव ठेवावी. अगदी बच्चू कडूंची देखील तुम्हाला गरज असणार नाही. मात्र पक्ष, जातीच्या झेंड्यखाली तुम्ही आपले प्रश्‍न विसरला आहात. त्यामुळे आजची अवस्था झाली आहे. यावेळी बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे, संचालक केशव मांडवडे, प्रहार संघटनेचे कृष्णा जाधव, कुबेर जाधव, केदा काकुळते, जयप्रकाश सोनवणे, नरेंद्र अहिरे, शेतकरी संघटनेचे दीपक पगार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com