i am relaxing at home : Khadase | Sarkarnama

मी घरी वाती वळतोय पण ही वात आगही लावू शकते : खडसे

संजय महाजन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जळगाव : ``होय, मी घरी वाती वळतो आहे. माझ्याबद्दल उद्धव ठाकरे बोलले ते बरोबर आहे. पण ही वात कोठेही लागू शकते. त्यातून आगही भडकू शकते, असे मत व्यक्त करत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज गुगली चेंडू टाकला. पण हा चेंडू टाकल्यानंतर माझी वात ही प्रकाश देणारी आहे, असाही खुलासा त्यानंतर केला.

उद्धव ठाकरे यांनी खडसे यांच्यावर जे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. त्यांनी सांगितले की मी पक्षासाठी मेहनत घेतलेला माणूस आहे. माझ्याकडे कोणते पद नाही. त्यामुळे ठाकरे हे बोलले. त्यांचे मत बरोबरच आहे.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक गुंडांना प्रवेश दिल्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्या पक्षात आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो, असे आश्वासन आमच्या नेत्यांनी दिले आहे. त्यानुसार हे घडत असावे. पक्षाचा विस्तार करत असताना अशा गोष्टी कराव्या लागतात, असेही आमच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र हा सारा पक्षच वाल्यांचा होऊ नये, एवढी अपेक्षा आहे.

धुळे महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजपने खडसे यांचे नाव किंवा फोटोही वापरलेला नाही. यावर बोलताना खडसे म्हणाले की महापालिकेची निवडणूक असल्याने तसे झाले असावे. जाणीवपूर्वक फोटो टाळलेला नसावा. ही काही लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक नाही की जिथे माझा फोटो वापरायला हवा.

संबंधित लेख