I am ready for open debate : Nitesh Rane warns Anil Parab | Sarkarnama

मी उत्तर देण्यास तयार; वेळ आणि जागा सांगावी : नितेश राणेंचे अनिल परबांना खुले आव्हान !

सुचिता रहाटे
गुरुवार, 25 मे 2017

मला माझ्या बाबांनी शिकविले आहे, कुणाच्याही पोटावर पाय देऊ नकोस. म्हणून आम्ही गप्प आहोत.  परंतु परब यांना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यात रस आहे असे दिसते . ते कोकणातले आम्ही सुध्दा कोकणवासी त्या नात्याने आम्ही भाऊबंद  झालो पण आता परबांना कोण समजावून सांगणार.?  

मुंबई  : "अनिल परब यांच्याविरोधात सगळा अहवाल दुनियेसमोर मांडायला तयार आहे. फक्त अनिल परब यांनी वेळ आणि जागा सांगावी पत्रकारांसमोर सगळी माहिती फोडायला मी  तयार आहे," असे खुले आव्हान नितेश राणे यांनी अनिल परब यांना केले आहे. 

 

 शिवसेनेतील गटनेते अनिल परब आणि काँग्रेस आमदार यांच्यातील संघर्षाचा  नवा अध्याय नितेश राणे यांनी लिहिला आहे . ते म्हणाले , "परबांमध्ये तेवढी हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे. त्यांची सगळी माहिती चव्हाट्यावर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असे करायला मला वेळ लागणार नाही . परंतु त्यामुळे शिवसेनेकडून मिळणारा त्यांचा पगार बंद होईल. मला माझ्या बाबांनी शिकविले आहे, कुणाच्याही पोटावर पाय देऊ नकोस. म्हणून आम्ही गप्प आहोत.  परंतु परब यांना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यात रस आहे असे दिसते . ते कोकणातले आम्ही सुध्दा कोकणवासी त्या नात्याने आम्ही भाऊबंद  झालो पण आता परबांना कोण समजावून सांगणार?  

नितेश राणेंनी ब्लॉगच्या माध्यमातून सुध्दा परब यांना डिवचले. ते म्हणाले की, रुबाब शिवसेना सोडल्यावर पण आहे म्हणून तर परत येण्यासाठी पाठीपाठी फिरत आहेत.कदाचित अनिल परबांना त्यांचे साहेब आणि पीए सगळं सांगत नसतील. अनिल परब ज्याचे पाय पडतात त्या आदित्यपेक्षा मी नक्कीच मोठा आहे म्हणून राणे साहेब तर लांबच राहिले पहिलं नितेशला उत्तर द्या!

परब, राणे यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून राजकीय वर्तुळात यांच्यातील वादाच्या चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित लेख