'त्या' मनसैनिकांचा मला अभिमान : राज ठाकरे

मुंबईत एल्फिस्टन रेल्वे स्थानकाच्या रेल्वे पुलावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे स्थानकांवर फेरीवाले हटविण्याच्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या सर्व मनसैनिकांचा मला अभिमान असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक वाॅलवर म्हटले आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची नावानिशी दखल राज यांनी घेतली आहे. या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी अधिक जवळीक साधण्याचा राज यांचा प्रयत्न आहे.
'त्या' मनसैनिकांचा मला अभिमान : राज ठाकरे

मुंबई : मुंबईत एल्फिस्टन रेल्वे स्थानकाच्या रेल्वे पुलावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे स्थानकांवर फेरीवाले हटविण्याच्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या सर्व मनसैनिकांचा मला अभिमान असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक वाॅलवर म्हटले आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची नावानिशी दखल राज यांनी घेतली आहे. या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी अधिक जवळीक साधण्याचा राज यांचा प्रयत्न आहे.

या पोस्टमध्ये राज यांनी 5 आॅक्टोबर 1917 रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर केलेल्या भाषणाची क्लीपही जोडली आहे. थोडक्यात हे आंदोलन आपल्याच आदेशाने झाले असेल राज यांना सुचवायचे आहे. आपल्या फेसबूक वाॅलवर राज म्हणतात.....

सस्नेह जय महाराष्ट्र,

१५ दिवसांत रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवा अन्यथा १६व्या दिवशी आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने हटवू, असा इशारा मी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना ५ ऑकटोबर २०१७ च्या मोर्च्याच्या वेळी दिला होता. रेल्वेने महापालिका हद्दीचं कारण पुढे करून टाळाटाळ करू नये म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना देखील परिस्थितीची कल्पना दिली होती.

तरीही १५ दिवसांत फेरीवाले हटवता आले नाहीत किंवा हटवायची इच्छा नव्हती, म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना आमच्या पद्धतीने हटवलं,रेल्वे स्थानक परिसर मोकळा करून दाखवला. प्रशासनाला प्रवाश्यांचे नाहीत तर फेरीवाल्यांचे हितसंबंध जपायचे आहेत म्हणून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायची सोडून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना अटक केली त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवलं.

रेल्वे प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच.

या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते माझे महाराष्ट्र सैनिक :

ठाणे
अविनाश जाधव, आशिष डोके, रवी सोनार, महेश कदम, संदीप साळुंके, विश्वजित जाधव, सुशांत सूर्यराव.

डोंबिवली
मनोज प्रकाश घरत, प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे,प्रकाश माने,सागर जेधे,रविंद्र गरुड,सिद्धार्थ मातोंडकर,अजय शिंदे,रतिकेश गवळी,गणेश गावडे,कृष्णा देवकर.

सांताक्रूझ
अखिल चित्रे, संदेश गायकवाड, हेमंत गायकवाड, विनल दरहीकर, चंद्रशेखर मडव, विशाल शिरवाडकर,

वसई
जयेंद्र पाटील, शिवाजी सुळे, झुबेर पठाण, विद्यानंद पवार, विजय सरदार, नामदेव पाताडे, दिनेश पाटील, आदिल मेमन, इकबाल मेमन, देवान रजक, प्रमोद आसवारे

कल्याण
अशोक मांडले, उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई,गणेश चौधरी,जितेंद्र राणे, सचिन शिंदे, सचिन मोरे, महेश भोईर, अंकुश राजपूत, सचिन लोहार, भूषण लांडे, अविनाश तेली

बदलापूर
उमेश तावडे, संगीता चेंदवणकर, योगेश जाधव, गणेश पिल्लई.

दहिसर
अनिल खानविलकर, राजेश येरुणकर, विलास मोरे, प्रितेश मांजरेकर, वसंत धोंडगे, रमाकांत मोरे, गणेश पुजारी, सचिन कदम, राजेंद्र कळ्वणकर, शैलेश हातिम, संतोष शिंदे, राजेश कासार

- राज ठाकरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com