I am in the Hearts of People says Eknath Khadse | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मी जनतेच्या मनात...जाहिरातीत फोटो नसला तरी फरक पडत नाही : एकनाथ खडसे 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 28 जुलै 2018

आपल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आपण कधीही श्रेयासाठी काम केलेले नाही, आपण अनेक प्रकल्प या जिल्ह्यासाठी मंजूर करून त्याचे कामही करून घेतले आहे. त्याचा जनतेला फायदा झाला त्यातच आपल्याला आनंद आहे - एकनाथ खडसे

जळगाव : मी जनतेसाठी काम करतो त्यामुळे त्यांच्या मनात मी आहे,जाहिरातीत माझा फोटो टाकला अन नाही टाकला काय? याचा कोणताही आपल्यावर फरक पडत नाही अशी भावना मत राज्याचे माजी महसुलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
 
जळगावातील मुक्ताईनगरातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी खडसे म्हणाले, "जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. त्यासाठी मी, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे यांनी केंद्रीय भृपूष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नितीन गडकरी यांनी या संमातर रस्त्याच्यां कामासाठी 100 कोटी 18 लाख रूपये मंजूर केले आहेत. त्याला आज (ता.27)ला मंजूरी मिळाल्याचे पत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त झाले आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल जळगावकरांना दिलासा मिळेल. शहरातील मेहरूण तलावाच्या विकासासाठीही 50 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. त्याचे कामही लवकरच करण्यात येईल." 

फोटोच्या श्रेयासाठी नाहीच
यावेळी पत्रकारांनी त्यांना पक्षातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीत आपला फोटो प्रसिध्द करण्यात आला नसल्याबाबत प्रश्‍न विचारला त्यावेळी बोलतांना ते म्हणाले, "आपल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आपण कधीही श्रेयासाठी काम केलेले नाही, आपण अनेक प्रकल्प या जिल्ह्यासाठी मंजूर करून त्याचे कामही करून घेतले आहे. त्याचा जनतेला फायदा झाला त्यातच आपल्याला आनंद आहे.याच कामामुळे आपण जनतेच्या मनात आहोत. जाहिरातील फोटो टाकला आणि नाही टाकला तरी आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. आपण जनेसाठी काम केले आहे, करीत आहोत आणि यापुढेही करीत राहणार आहोत," यावेळी खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.

संबंधित लेख