Hundred Old Tradition Stopped in Pathardi By Shivsena Corporator | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

शिवसेनेच्या सुदाम डेमसेंनी बंद केला पाथर्डीचा शंभर वर्षांचा बडेजाव अन्‌ मानपान 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राजकारण, सहकारात वेगळी ओळख अन्‌ कोट्याधीश शेतकऱ्यांचे गाव असलेल्या पार्थडीच्या सहकारी सोसायटीची आजची बैठक क्रांतीकारी ठरली. या सभेत शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या पुढाकाराने शतकापासूनचा बडेजाव व मानपान बंद करुन तो पैसा गावाचा सामुहिक उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा ठराव मांडला.

नाशिक : शहरातील पाथर्डी गाव म्हणजे जमिनीला माणिक मोत्यांचा भाव आल्याने कोट्याधीश शेतकऱ्यांचे गाव. शंभर वर्षांपासून लग्नात वराची वेशीपर्यंत मिरवणुक काढणारे गाव. मात्र, राजकीय नेत्यांना आता दृष्टी नवी आली आहे. युवकांनी काळाची पावले ओळखली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे युवा नगरसेवक सुदाम डेमसे यांनी पुढाकार घेतला. शंभर वर्षांची मानपानाची प्रथा बंद केली. आता त्या पैशांतुन गावातील युवकांच्या रोजगारासाठी उद्योग उभारण्यात येणार आहे. 

राजकारण, सहकारात वेगळी ओळख अन्‌ कोट्याधीश शेतकऱ्यांचे गाव असलेल्या पार्थडीच्या सहकारी सोसायटीची आजची बैठक क्रांतीकारी ठरली. या सभेत शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या पुढाकाराने शतकापासूनचा बडेजाव व मानपान बंद करुन तो पैसा गावाचा सामुहिक उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा ठराव मांडला. त्याला भाजपचे युवा नगरसेवक भगवान दोंदे यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे अध्यक्ष संजय डेमसे यांनी पाठींबा दिला. त्यामुळे मानपानावर होणारी हजारोंची उधळपट्टी थांबली. हा पैसा एकत्र करुन त्यातुन गावाचा सामुहिक उद्योग उभारला जाईल. त्यात गावातील युवकांना रोजगार मिळेल. त्यामुळे एक प्रागतिक पाऊल पडले. 

यावेळी उपस्थित उपाध्यक्ष एकनाथ शिरसाठ, जेष्ठ सदस्य भिकाभाऊ डेमसे, निवृत्ती गवळी, सुदाम जाचक, जयसिंग डेमसे, त्र्यंबक कोंबडे, सुनील कोथमिरे, जिजाबाई डेमसे, पुष्पा नवले, सूनील नवले आदी जाणत्या मंडळीनींही युवकांच्या या निर्णयाचे स्वागत केले. परिसरातील प्रतिष्ठीत असलेल्या व एकेकाळी दुष्काळी संबोधल्या जाणाऱ्या या गावात शतकापासून मानपानाची मोठी परंपरा आहे.

गावात दरवर्षी सरासरी पंचवीस विवाह होतात. त्यात वराची दोन- अडीच किलोमीटर वेशीपर्यंत सवाद्य मिरवणुक काढली जाते. प्रत्येकाला शेला-पागोटे व मानाचे वस्त्र दिले जाते. अगदी दशक्रीया विधीतही प्रत्येकाला टॉवेल, टोपी दिली जाते. त्यावर हजारोंचा खर्च होतो. गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने मोठे बांधकाम प्रकल्प आलेत. त्यामुळे जमिनींना सोन्याचे नव्हे हिरे माणकांचे भाव आल्याने या मानपानाला अधिकच जोम आला होता. आता ते बंद होणार आहे. 

संबंधित लेख