HRD ministry refuses proposal to award doctorate to Shahrukh Khan | Sarkarnama

शाहरुख खानला डॉक्‍टरेट देण्यास मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा नकार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) युनिर्व्हसिटीने शाहरुख खानला विशेष सन्मान म्हणून डॉक्‍टरेट पदवी देण्याची केलेली विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने फेटाळली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) युनिर्व्हसिटीने शाहरुख खानला विशेष सन्मान म्हणून डॉक्‍टरेट पदवी देण्याची केलेली विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने फेटाळली आहे.

चित्रपट अभिनेता शाहरुख खान याला यापूर्वीच अनेक विद्यापीठांनी अशी डॉक्‍टरेट पदवी दिली असल्याचे कारण पुढे करून मंत्रालयाने त्यास डॉक्‍टरेट देण्यास मनाई केली आहे. माहिती अधिकाराच्या एका अर्जातून ही माहिती समोर आली आहे.

शाहरुख खान 'जेएमआय'चा माजी विद्यार्थी आहे. विद्यापीठाने त्याच्याकडे डॉक्‍टरेट देण्याबाबत पत्रव्यवहार केला असताना शाहरुख खानने ही पदवी स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर विद्यापीठाने हा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला होता. मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाने 2016मध्ये शाहरुख खानला डॉक्‍टरेट ही पदवी दिली असल्याने पुन्हा एकदा तीच पदवी देण्यास मंत्रालयाने मनाई केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

संबंधित लेख