How will Satej Patil Go to Mumbai asks Mahadeorao Mahadik | Sarkarnama

मग आमदार सतेज पाटील मुंबईला कसे जातील ? - महादेवराव महाडिक

सुनील पाटील
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

गोकुळच्या करवीर तालुका संपर्क सभेत राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्यासोबत जो प्रकार झाला तो पूर्णतः चुकीचा आहे. त्यांना झालेली मारहाण हे मलाही पटले नाही.

 -महादेवराव महाडिक

 

कोल्हापूर  : " लोकशाही मेली काय? हे विचारण्यासाठी मी आमदार सतेज पाटील यांच्या घरी गेलो होतो. याला हे बंद, त्याला ते बंद ही काय पद्धत आहे का? हे बावड्यात बाहेर पडतील आणि कोल्हापुरातून मुंबईला रस्त्याला कधी एकटे जातील का? हे विचारण्यासाठी मी एकटाच त्यांच्या घरी गेलो होतो. पण आमदार सतेज पाटील घरात नसल्याने त्यांची भेट झाली नाही ,"माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले.

महाडिक म्हणाले, " गोकुळच्या करवीर तालुका संपर्क सभेत राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्यासोबत जो प्रकार झाला तो पूर्णतः चुकीचा आहे. त्यांना झालेली मारहाण हे मलाही पटले नाही.  असा प्रकार कधीच होऊ नये. सभासद लहान असो किंवा मोठा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे संचालकांनी किंवा सत्तारूढ लोकांनी दिलीच पाहिजेत. नेजदार यांच्याबाबतीत झालेला प्रकार कोणी केला हे मलाही माहिती नाही. पण  कोणाच्या तरी अंगावर हात टाकला हा प्रकार चुकीचा आहे. "

"पण याला ही बंद त्याला ते बंद त्याला इतर फिरू देणार नाही असेही म्हणणे चुकीचे आहे. हे कसबा बावड्यातना बाहेर पडतील आणि कोल्हापुरातून मुंबईला एकटेच रस्त्याने जातील का? असं कधी होत नाही. असं कोणालाही हे बंद आणि ते बंद म्हणून चालत नसते ,"असेही महाडिक यांनी सांगितले.

संबंधित लेख