वयात येताच आमदारकी दिली! तरीही निरंजनवर अन्याय कसा : ऱाष्ट्रवादीचा सवाल

वयात येताच आमदारकी दिली! तरीही निरंजनवर अन्याय कसा : ऱाष्ट्रवादीचा सवाल

पुणे : निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राष्ट्रवादीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. डावखरे यांच्यावर राष्ट्रवादीने अन्याय केला असे त्यांचे म्हणणे योग्य नाही. त्यांच्या संधिसाधूपणाचा फटका भाजपलाही बसेल, असा इशारा ऱाष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिला.

याबाबत गर्जे यांनी म्हटले आहे की डावखरे यांच्यावर विश्वास टाकून आमदारकी तसेच विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देऊनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.

निरंजन डावखरे यांचा संधीसाधूपणाचा इतिहास बघता ते जिथे कुठे जाणार असतील त्या पक्षाला त्यांच्या या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी बसेल असा इशाराही शिवाजीराव गर्जे यांनी दिला.
 
निरंजन डावखरे यांना पहिल्या वेळेस वय भरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही. मात्र वय भरल्यानंतर विधान परिषदेची आमदारकी दिली. एकाच वेळी मुलगा आणि वडील विधानपरिषदेचे आमदार बनवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. कै. वसंतराव डावखरे संकटात असताना पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीर उभा राहिला. वसंतराव डावखरे यांना प्रदीर्घ काळ विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि उपाध्यक्ष पद पक्षाने दिले होते. असे असतानाही पक्षाने अन्याय केला म्हणणे योग्य नसल्याचेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com