पवार साहेबांना मी कसा सोडेन? : छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा

पवार साहेबांना मी कसा सोडेन? : छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा

पुणे : मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मी शिवसेना सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत आलो. जिवावर बेतले तरी घाबरलो नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस कशी सोडेन, असा सवाल विचारत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले. गेल्या दोन-अडीच वर्षांत माझे कुटुंबीय हे आठवड्यातून किमान एकदा पवार साहेबांच्या घरी होते. त्या पवार साहेबांना मी कसा सोडेन, असा भावोत्कट सवाल त्यांनी केली. 

पुणे येथे हल्लोबोल आंदोलनाच्या समारोप सभेत पुण्यात बोलताना भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या जनतेने आपापसांतील भांडणे थांबविण्याची गरज आहे. मी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप होता. मात्र मी मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला मी कधीच विरोध केला नाही, असा दावा त्यांनी केला

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यापासून ते भाजपचे दिलीप कांबळे यांनी माझ्या सुटकेसाठी भूमिका घेतली. त्यांच्याविषयी मी आभार मानले तर मी इतर पक्षांत जाणार, अशी चर्चा सुरू झाली. त्या चर्चेत तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि आपल्यातील बंध उलगडून दाखवत असताना पवार साहेबांना सोडून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडल आयोगाची अंमलबजावणी त्यांनी केली. महिलांना आरक्षण दिले. देशातील बदलत्या हवेत पवार साहेबांसारखा नेता हवा आहे. पवार यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पार्टी सोडण्याची गरज काय आहे? पार्टीचे चुकत असेल तर त्या चुका पक्षात राहूनच दुरूस्त केल्या जातील, असे त्यांनी नमूद केले, 

बचेंगे ते और भी लढेंगे, असा बाणा दाखवत पक्षाने सांगेल तेथे येईल. रस्त्यावरच्या आंदोलनाही मी पक्षासोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com