Honeypreet arrested at last | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

 डेरा सच्चा सौदाचा प्रमुख  गुरमीतची दत्तक 'कन्या'  हनीप्रीत अखेर अटकेत 

पीटीआय
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

चंडीगड  : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सानला आज पंजाबमध्ये अटक करण्यात आली. 

विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कारप्रकरणी रामरहिमलाला दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरामध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारास हनीप्रीतने चिथावणी दिली होती असे चौकशीअंती स्पष्ट झाले होते. मागील महिनाभरापासून पोलिस तिच्या मागावर होते. 

चंडीगड  : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सानला आज पंजाबमध्ये अटक करण्यात आली. 

विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कारप्रकरणी रामरहिमलाला दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरामध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारास हनीप्रीतने चिथावणी दिली होती असे चौकशीअंती स्पष्ट झाले होते. मागील महिनाभरापासून पोलिस तिच्या मागावर होते. 

हनीप्रीतला झिरकापूर पतियाळा रोडवर अटक करण्यात आली असून तिला उद्या (ता.4) रोजी न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहे. पंचकुलामधील हिंसाचारात हनीप्रीतची नेमकी काय भूमिका होती याचा तपास केला जाणार असून यासाठी तिला पोलिस कोठडी ठोठावण्यात यावी अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे करणार आहोत असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 

महेशकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने शरण येण्यापूर्वीच हनीप्रीतला अटक केली. यानंतर पुढील चौकशीसाठी तिला पंचकुलामध्ये आणण्यात आले. तिच्यासोबत असणाऱ्या अन्य एका महिलेसही अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर तिची अटक निश्‍चित मानली जात होती. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीसही बजावली होती. नेपाळमध्येही तिचा शोध घेतला जात होता. 
 

गेल्या महिनाभरापासून पोलिसांच्या हाताला  न लागणाऱ्या हनीप्रीतने आज 'आज तक 'चॅनलला सविस्तर मुलाखत दिली .  या मुलाखतीत हनीप्रीतने आपले आणि गुरमीत  बाबाचे संबंध बाप लेकीचे आहेत असे डोळ्यात पाणी आणीत सांगितले . तिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले . 
हनीप्रीत  म्हणाली, "  माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे आहेत . देशद्रोही ठरविण्यात आल्याने मी तणावाखाली होते .मी जर बाबांबरोबर न्यायालयात  होते तर बाहेर जमलेल्या  एवढ्या मोठ्या समुदायास मी कशी चिथावणी देणार? बाबांच्या भक्तांनी हिंसाचार केलेला नाही . काही समाजकंटकांनी  हा हिंसाचार केला होता . माझ्याविरोधात कोणाकडेही पुरावे नाहीत . "

"मुलगी आणि पित्याचे पवित्र नाते कलंकित करण्यात आले आहे .  वडील आपल्या मुलीच्या डोक्‍यावर हात ठेवू शकत नाहीत? " असा उलटा प्रश्न तिने विचारला . पती विश्‍वास गुप्ता यांनी बाबा आणि हनीप्रीत यांच्यातील अनैतिक  संबंध असल्याचा आरोप केला होता . पण आपल्याला विश्वास गुप्ता विषयावर बोलायचे नाही असा पवित्र तिने घेतला . 

संबंधित लेख