पंतप्रधान कार्यालयाच्या फोनची वाट पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना सेल्स कंपन्यांचे कॉल्स हैराण करतात तेंव्हा  !

आपल्याला गृह कर्ज घायचे का ? इन्शुरन्स पॉलिसी काढायची का ? व फ्लॅट घ्यायचा का इथपासून अनेक प्रकारचे कॉल्स त्यांना घ्यावे लागतात .
पंतप्रधान कार्यालयाच्या फोनची वाट पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना सेल्स कंपन्यांचे कॉल्स हैराण करतात तेंव्हा  !

मुंबई , : राज्यातील कायदा व सुव्यवस्था संभाळताना गृहखात्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कधी कोणती परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही.   गृहखात्याचे मंत्रालयात बसणारे अपर मुख् सचिव,प्रधान सचिव यांना डोळ्यांत तेल घालून सतर्क राहावे लागते.कधी कोणाचा फोन येईल सांगता येत नाही.यामुळे मंत्रालयातील गृहखात्याचे अपर मुख्य सचिव दर्जाचे सनदी अधिकार्यांचे 24 तास कान मोबाईलच्या रिंगटोनकडे लागलेले असतात.

डाँ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेले आरोपी आणि तपास याचबरोबर कर्नाटक पोलिसांची कारवाई याबाबत केव्हा कोणाचा फोन येईल याचा नेम नाही,असे अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकार्याचे मत आहे.

पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय,आयबी,गुप्तचर विभाग अशा कोणत्याही कार्यालयातून फोन येऊ शकतो.यामुळे सतर्क राहावेच लागते.त्यामुळे साधा मिस्ड काँल पडला तरी आम्ही कॉल  बॕक करतो.विनाकारण बालंट नको,असे या अधिकार्याचे म्हणणे आहे.मात्र प्रत्येक कॉल  घेण्यामुळे मार्केटिंग आणि सेल्स कंपन्यांचे फोन मात्र नाहक घ्यावे लागत आहेत.त्याचा त्रास सहन करावा लागत आहे,असे हसतहसत या अधिकार्यांने सांगितले .
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com