Hitendra Thakur aggressive about Palghar constituency | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पालघर मतदार संघावर आमचाच हक्क  : हितेंद्र ठाकूर 

संदीप पंडित 
मंगळवार, 12 मार्च 2019

पालघर मतदार संघावरून युतीमध्ये तणाव असून तो अजूनही शांत झालेला नाही . तर दोन्ही काँग्रेस आघाडीचाही उमेदवार ठरलेला नाही या पार्श्वभूमीवर बविआने मात्र निवडणुकीची तयारी केली आहे . 

विरार :  "पालघर लोकसभा  मतदार संघावर आमचा हक्क आहे.  या मतदार संघाचे पहिला खासदार हा आमचा निवडून आले होता . त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत ," अशा शब्दात बहुजन विकास आघाडी (बविआ)चे सर्वोसर्व हितेंद्र ठाकूर यांनी पालघरवर आपला दावा सांगितला आहे  . 

आतापर्यंत बविआ काय करणार यावर ठाकूर यांनी मौन बाळगले होते आज प्रथमच त्यांनी याबाबत आपण काय करणार ते सांगितले. 

 हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले ,"आता पर्यंत प्रत्येक वेळी आम्ही सर्वाना बिनशर्त पाठिंबा देत आलो आहोत. यावेळी सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी मी सर्वच राजकीय पक्षाशी बोलत  आहे.  सर्वच पक्षात माझे मित्र असून त्यांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळे यावेळी पुन्हा आम्हीच निवडून येणार आहोत . "

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वानीच निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे.  कोणाची आघाडी तर कोणाची युती आपापले मतदार संघ मजबूत करण्यावर लक्ष देत आहेत . पालघर मतदार संघावरून युतीमध्ये तणाव असून तो अजूनही शांत झालेला नाही . तर दोन्ही काँग्रेस आघाडीचाही उमेदवार ठरलेला नाही या पार्श्वभूमीवर बविआने मात्र निवडणुकीची तयारी केली आहे . 

 

संबंधित लेख