Hire's NCP Entry postponed by Chagan Bhujbal | Sarkarnama

मराठा आंदोलनामुळे छगन भुजबळांनी हिरेंचा राष्ट्रवादी प्रवेश टाकला लांबणीवर 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 28 जुलै 2018

माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नाशिक जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांसह त्यांच्या विविध समर्थक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह त्यांचे समर्थक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे विविध नेते येत्या 2 ऑगस्टला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. गेले दोन महिने त्याची तयारी सुरु होती.

नाशिक : राज्यभर मराठा आंदोलन जोरात सुरु आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा भाजपचे नेते प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबीयांचा येत्या 2 ऑगस्टला होणारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केलेल्या सुचनेनंतर हा निर्णय झाला आहे. 

माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नाशिक जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांसह त्यांच्या विविध समर्थक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह त्यांचे समर्थक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे विविध नेते येत्या 2 ऑगस्टला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. गेले दोन महिने त्याची तयारी सुरु होती. गेल्या आठवड्यात याबाबत हिरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. 

मात्र त्यानंतर अचानक राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले. राज्याच्या विविध भागात हे आंदोलन सुरु आहे. त्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. या स्थितीत पक्षप्रवेश सोहळ्याविषयी चर्चा झाली. भुजबळ गेले तीन दिवस नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी भुजबळ फार्म येथे प्रशांत हिरे, अपूर्व हिरे, अद्वय हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, रवीद्र पगार यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यात हा निर्णय झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख