भाजपच्या हिरेंनी घेतली शरद पवारांची भेट : उद्या राष्ट्रवादीत प्रवेश?

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. नाशिकला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी उद्या (ता.15) आपल्या निवडक सहकारी व समर्थकांची बैठक नाशिक शहरात आयोजित केली आहे. या बैठकीनंतर ते राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाविषयी घोषणा करतील असे सूत्रांनी सांगितले. हिरेंच्या या निर्णयाने भाजपला मोठा राजकीय धक्का बसेल.
भाजपच्या हिरेंनी घेतली शरद पवारांची भेट : उद्या राष्ट्रवादीत प्रवेश?

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. नाशिकला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी उद्या (ता.15) आपल्या निवडक सहकारी व समर्थकांची बैठक नाशिक शहरात आयोजित केली आहे. या बैठकीनंतर ते राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाविषयी घोषणा करतील असे सूत्रांनी सांगितले. हिरेंच्या या निर्णयाने भाजपला मोठा राजकीय धक्का बसेल. 

उद्या (ता.15) सकाळी नाशिक शहरात ही बैठक होईल. त्यात माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांसह विविध नेते उपस्थित राहतील. 'शरद पवारांशी आज झालेली चर्चा राजकीय स्वरुपाची नव्हती. काही कामानिमित्त मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो.' असे या शिष्टमंडळातील सदस्याने सांगितले. 

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेषत जिल्हा बॅंकेशी संबंधीत अनेक अडचणी आहेत. त्यात शासनाने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघ तसेच नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात हिरे कुटुंबीय इच्छुक उमेदवार आहेत. त्यासाठी त्यांनी शहराची ग्रामदेवता कालीका देवी मंदिरात पूजन करुन मतदारसंघात संपर्क मोहीम राबविली होती. मात्र, भाजपकडून योग्य प्रतिसाद नव्हता. त्यामुळे गेले काही दिवस ते राष्ट्रवादी काँग्रसच्या विविध नेत्यांच्या संपर्कात होते.

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला समर्तन दिले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपशी त्यांचा काडीमोड अपेक्षीत होता. त्याचा निर्णय उद्या झाल्यास 2019 च्या संभाव्य निवडणुकांच्या दृष्टीने भाजपला तो मोठा धक्का ठरु शकतो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com