hire family joins ncp | Sarkarnama

हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीत आले; भुजबळांचे काम सोपे झाले

संजय मिस्किन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकिय घराणे म्हणून प्रसिध्द असलेल्या हिरे कुटुंबियांनी भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीच प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत हिरे व अपूर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व छगन भुजबळ उपस्थित होते. हिरे यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसला नाशिक मधे वजनदार उमेदवार मिळाल्याने भाजप समोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे मानले जाते.

हिरे कुटूंबिय 2012 च्या दरम्यान राष्ट्रवादीला सोडचिठ्ठि देत भाजपमधे सहभागी झाले होते. अपूर्व हिरे यांना भाजपने विधानपरिषद सदस्यत्वाची संधी दिली होती. मात्र आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

आता तन-मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काम करू. चार वर्षांत भाजपने काहीच केले नाही. देशाचे भवितव्य चांगले करायचे असेल तर आपल्याला अभ्यासू व खंबीर नेतृत्व पाहिजे. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबत येण्याचा निर्णय घेतला, असे प्रशांत हिरे यांनी या वेळी सांगितले.

``भाजपमध्ये प्रवेश हा हिरे कुटुंबियांचा अपघात होता. हिरे कुटुंबाची विचारधारा भिन्न आहे. मालेगावची राजकीय स्थिती बदलण्यासाठी छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा पक्षप्रवेश झाला. भुजबळांच्या भुजांना प्रशांत, अपूर्व आणि अद्वय हिरे बळ देतील हा विश्वास आहे, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

हिरे यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात पार्टीला चांगली मदत मिळेल.  छगन भुजबळ यांना आणखी ताकदीने काम करता येईल, अशे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख