hingoli zp | Sarkarnama

हिंगोलीत शिवसेनेचा भाजपला कडवा विरोध

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

हिंगोली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेने अखेर भाजपची साथ सोडली असून जिल्हा परिषदेतही हाच पॅटर्न अंमलात येण्याची शक्‍यता आहे.

या प्रकारामुळे भाजपला जोरदार हादरा बसला आहे. हिंगोलीतील भाजपची घौडदौड रोखण्यासाठीच शिवसेनेने ही चाल खेळली आहे. 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने उघडपणे शिवसेनेशी दोस्ती करून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र यानुसार भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी यशस्वी केली.

हिंगोली पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस सदस्यांनी एकत्र येऊन पदे मिळविली. कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी एकत्र येऊन सभापती व उपसभापतिपद अनुक्रमे शिवसेना व कॉंग्रेसला मिळवून दिले. भाजपला सभागृहात विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. 
दुसरीकडे सेनगाव पंचायत समितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन पुन्हा एकदा भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचे काम केले. शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तासंपादनाला बिनशर्त पाठिंबा दिला.

सेनेच्या या खेळीमुळे सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात गेली. कळमनुरी पंचायत समितीत शिवसेनेने निवडणुकीत सहभाग घेतला मात्र बहुमत कॉंग्रेसकडे होते तर औंढा नागनाथ येथे बहुमत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांची निवड झाली. वसमत पंचायत समितीत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते त्यामुळे सेना तटस्थ राहिली. 
शिवसेना जिल्ह्यात आक्रमक 
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी शिवसेना आता जिल्ह्यात आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला साथ द्यायची नाही याची काळजी घेत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध डावपेच आखले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची दाट शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सेना आणि भाजप एकत्र आले तर नाराज अपक्षांना घेऊन सत्ता मिळवली जाऊ शकते. सेनेने आता भाजपविरोधी पत्ते उघड केल्यामुळे जिल्हा परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सेनेसोबत सत्तेची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 
 
संबंधित लेख