hindu women senaotor in pakistan | Sarkarnama

पाकिस्तानात प्रथम हिंदु महिला बनल्या सिनेट 

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

कराची : मुस्लिम बहुल असलेल्या पाकिस्तानमध्ये प्रथम हिंदु दलित महिला प्रथमच सिनेट म्हणून निवडून आल्या आहेत. कृष्णाकुमारी कोहली असे त्यांचे नाव असून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या (पीपीपी) त्या सदस्य आहेत. 

कराची : मुस्लिम बहुल असलेल्या पाकिस्तानमध्ये प्रथम हिंदु दलित महिला प्रथमच सिनेट म्हणून निवडून आल्या आहेत. कृष्णाकुमारी कोहली असे त्यांचे नाव असून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या (पीपीपी) त्या सदस्य आहेत. 

डॉन दैनिकाने दिलेल्या माहिती नुसार कृष्णाकुमारी कोहली (वय 39) या सिंध प्रांतातून ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत तो मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहे. सिंध प्रांतातील थार जिल्ह्याच्या नगरपारकर गावच्या त्या रहिवाशी आहेत. कोहली यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.कोहली आणि त्यांच्या कुटुंबाला येथील एका सावकारांने तीन वर्षे बंदी म्हणून ठेवले होते. त्यावेळेला त्यांना बंदी बनविण्यात आले होते त्यावेळी त्यांचे वय आठ वर्षे होते. 

पुढे कोहली यांनी लालचंद यांच्याशी विवाह केला.ज्यावेळी लग्न झाले त्यावेळी त्या नववीत होत्या. लग्नानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदवित्तूर पदवी घेतली आहे. सिंध विद्यापिठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पाकिस्तानाच स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी त्या काम करतात. त्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रुपलो कोहलीच्या कुटुंबातील आहेत.सिंध प्रांतात सिनेटसाठी झालेल्या निवडणुकीत कोहली निवडून आल्या आहेत. या प्रांतात मात्र सत्ताधारी नवाज शरीफ यांच्या पक्षाने सर्वाधिक म्हणजे 15 जागा जिंकल्या आहेत. कोहली मात्र पीपीपीच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. कोहली यांचा भाऊही पीपीपीचा कार्यकर्ता आहे. 

संबंधित लेख