Hindu Minister in Pakistan Cabinet | Sarkarnama

पाकिस्तानमच्या मंत्रिमंडळात प्रथमच हिंदू खासदार दर्शन लाल यांची वीस वर्षांनंतर प्रथमच नियुक्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नवाज शरीफ यांना 'पनामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे नवाझ शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. शुक्रवारी (ता.4) त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दर्शन लाल (वय 65) या हिंदू खासदाराचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रीपदी निवड झाली आहे.

नवाज शरीफ यांना 'पनामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे नवाझ शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. शुक्रवारी (ता.4) त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दर्शन लाल (वय 65) या हिंदू खासदाराचा समावेश केला आहे. पाकिस्तानमध्ये दोन दशकात प्रथम हिंदू साखसादारा कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी एकूण 47 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यातील 19 राज्य मंत्री आहेत.

पाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या समन्वयाची जबाबदारी दर्शन लाल यांच्यावर खाकन यांनी दिली आहे. लाल हे पेशाने डॉक्‍टर आहेत. सध्या सिंध प्रांतात मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. 2013 मध्ये ते "पीएमएल-एन' पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्याक कोट्यातून दुसऱ्यांचा खासदार म्हणून निवडून आले आहेत. शरीफ यांच्या मंत्रिमंडळात सुरक्षा व ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे ख्वाजा आसिफ यांच्याकडे अब्बासी यांनी परराष्ट्र मंत्रालय सोपविले आहे. पाकिस्तान सरकारंमध्ये 2013 पासून कोणी पूर्णवेळ परराष्ट्र मंत्री नव्हते. हिना रब्बानी खर या तेथील शेवटच्या परराष्ट्र मंत्री होत्या. आता पाकिस्तानला हिंदू मंत्र्याशिवाय परराष्ट्र मंत्रीही मिळाला आहे.

संबंधित लेख