hindu come together mohan bhagwat | Sarkarnama

जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

शिकागो : सर्वांच्या भल्यासाठी जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

शिकागो : सर्वांच्या भल्यासाठी जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

शिकागो येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत सुमारे दोन हजार श्रोत्यांसमोर सरसंघचालक भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. ""हिंदूंनी कशातही मागे राहू नये. आपण हजारो वर्षांपासून का सहन करत आहोत? आपल्याकडे सर्व काही आहे आणि आपल्याला बरेच काही माहिती आहे. मात्र, आपण त्या ज्ञानाचा वास्तव जीवनात वापर करण्यास विसरलो आहोत, आपण एकत्र येण्यासही विसरलो आहोत. त्यामुळे जगभरातील हिंदूंनी मतभेद विसरून सर्वांच्याच भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,'' असे भागवत म्हणाले. 

हिंदूंनी प्रगती करण्यासाठी सहकार्य आणि एकसंधपणा ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी महाभारतातील काही उदाहरणेही दिली. आपली प्राचीन मूल्ये ही वैश्‍विक असून, आता त्याला हिंदू संस्कार म्हटले जाते, हिंदू समुदायामध्ये अनेक बुद्धिमान लोक असले तरी आपण एकत्र येऊन काम करत नाही, असेही ते म्हणाले. 

संबंधित लेख