hindu adhivation | Sarkarnama

गोव्यात 14 जूनपासून  अ.भा. हिंदू अधिवेशन 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी गोव्यात यावर्षीही 14 ते 17 जून दरम्यान अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता उदय धुरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील जनभावना संपूर्ण देशभरात पोहचविण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अशाप्रकारचे अधिवेशन आयोजित करीत असते. या अधिवेशनाला भारतासह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशातील नागरिक उपस्थित राहतात. धुरी म्हणाले,"" केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजप सत्तेवर आहे. हे हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने समाधानकारक असले तरी आजही हिंदुत्वनिष्ठांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. काश्‍मीरचा विषय आजही एक भळभळती जखम बनून राहिला आहे. जवानांवरील दगडफेक, त्यांच्या हत्या आजही रोखता आलेल्या नाहीत. समान नागरी कायदा आणि श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.'' 

मागील अधिवेशनात निश्‍चित झालेल्या समान कृती कार्यक्रमाला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे करणार असल्याचे धुरी म्हणाले. भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ.उपेन्द्र डहाके, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक हे यावेळी उपस्थित होते.  

संबंधित लेख