भिवंडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या  मोर्चाला उच्च न्यायालयाचा ब्रेक 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येत्या शुक्रवार 28 तारखेला मोर्चा आयोजीत केला होता.सदर मोर्चामध्ये हिंसाचार होण्याची पोलीसांना गोपनीय माहिती मिळाल्याने चार दिवसांपुर्वी पोलीसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
NCP
NCP

भिवंडी :  भिवंडी शहरात वीज पुरवठा व वीज बील वसुल करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येत्या शुक्रवार 28 तारखेला मोर्चा आयोजीत केला होता.सदर मोर्चामध्ये हिंसाचार होण्याची पोलीसांना गोपनीय माहिती मिळाल्याने चार दिवसांपुर्वी पोलीसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

 तसे  या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक अध्यक्ष शेख मो.खालीद गुड्डू यांना पोलीसांनी पत्र दिले होते. त्यामुळे खालीद गुड्डू यांनी मोर्चाला परवानगी द्यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली होती. ही याचिका   आज रोजी दुपारी न्यायालयाने फेटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका दिला. 

 भिवंडीतील वीज कंपनी विरोधात मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खालीद गुड्डू यांनी शहरात प्रचार मोहिम सुरू केली होती. फेसबुक, व्हॉट्सअप व सोशल मिडीयावर प्रक्षोभक मॅसेज आल्याने पोलसांनी गंभीर दखल घेत या मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त खंडेराव धरणो यांनी पत्रकारांना दिली होती.

तसेच राष्ट्रवादी पक्षाला देखील या बाबत सुचीत केले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष खालीद गुड्डू यांनी मुंबई उच्च न्यायालयांत धाव घेऊन मोर्चाची परवानगी मागितली.मात्र न्यायालयाने कायदा सुव्यवस्था व सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून सदर याचिका   फेटाळली. या मोर्चाच्या बंदोवस्ताच्या निमीत्ताने पोलीसांवर प्रचंड दबाव आला होता.परंतू न्यायालयाच्या निर्णयाने पोलीसांना दिलासा मिळाला असला तरी पोलिसांनी सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. न्यायालयाचा निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात निराश वातावरण आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com