झोटिंग समितीचा अहवाला द्या ; हेमंत गवंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

EKNATH-KHADSE
EKNATH-KHADSE

मुंबई : एकनाथ खडसे यांचा पुण्यातील भोसरी एमएआयडीसीतील  जमिनीचा घोटाळा चव्हाट्यावर आणणारे हेमंत गवंडे यांनी झोटिंग समितीच्या अहवालाची मागणी केली आहे. गवंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून अहवालाची प्रत मिळावी असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

'एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांनी भोसरी येथील एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आला होता. त्यानंतर मी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करूनघेतली नाही. त्यामुळे मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला (एसीबी) गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते', असे गवंडे यांनी पत्रात नमूद केले आहे. 


'राज्य सरकारनेही या प्रकरणी न्या. झोटिंग समितीची स्थापना करून स्वतंत्र चौकशी केली आहे. त्याचा अहवाल सरकारकडे सादर झाल्याचे प्रसार माध्यमांतून मला समजले आहे. याप्रकरणाची वस्तुस्थिती व अहवालातील मुद्दे यांची तपासणी करण्यासाठी हा अहवाल मला मिळावा'असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.  


याबाबत गवंडे यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण सर्वप्रथम मी निदर्शनास आणुन दिले आहे.त्यामुळे मी उपस्थित केलेले मुद्दे व अहवालातील मुद्दे तपासण्यासाठी मला अहवाल मिळावा अशी माझी मागणी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्रलिहिल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com