Heman Takle NCP Birthday Maharashtra Politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आजचा वाढदिवस : हेमंत प्रभाकर टकले, विधान परिषद सदस्य.

संपत देवगिरे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

हेमंत टकले (जन्म - 9 सप्टेबर, 1946)

खजिनदार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
माजी अध्यक्ष - अ. भा. नाट्य परिषद,
सल्लागार - कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक.
संस्थापक अध्यक्ष - नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड

 

 

 

 

हेमंत टकले यांचा जन्म 9 सप्टेबर, 1946 ला नाशिक येथे झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय व विश्‍वासू सहकारी म्हणून हेमंत टकले यांचा परिचय गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राला आहे. राष्ट्रवादी काँ ग्रेसतर्फे ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करीत आहेत. राज्याच्या राजकीय, सामाजिक व विविध विषयांतील, सर्व भागातील बारीक सारीक तपशील संकलीत करुन ते विधीमडळात प्रश्‍न मांडण्यात ते आघाडीवर असतात. नुकत्याच झलेल्या पावसाळी अधिवेशनात सर्वाधीक 136 प्रश्‍न उपस्थित करणारे सदस्य ते होते. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात ते सक्रीय असले तरी राजकारणविरहीत व्यक्तीमत्व अशीच त्याची प्रतिमा आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली. सध्या पक्षाचे खजीनदार म्हणून ते काम पाहतात.

त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या पेठे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण एच. पी. टी. महाविद्यालयात झाले. त्यांनी बी. वाय के. महाविद्यालयातून एम.बी.ए. चे शिक्षण घेतल्यावर ते हॉटेल व्यवसायाकडे वळले. नाशिकचे प्रसिध्द हॉटेल 'ग्रीन व्ह्यू'चे ते संचालक आहे. उमेदीच्या काळातच नाट्य क्षेत्रात त्यांना आवड निर्माण झाली. हौशी व व्यवसायिक रंगभूमिवर 'अगोचर', 'एकच प्याला' यासह विविध नाटकांतून त्यांनी अभिनय केला.

संबंधित लेख