पुण्यात हेल्मेटसक्ती राहणारच : दंडवसुली रस्त्यावर होणार नाही तर चलन घरी मिळणार

पुण्यात हेल्मेटसक्ती राहणारच : दंडवसुली रस्त्यावर होणार नाही तर चलन घरी मिळणार

पुणे : शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेटसक्ती विरोधात आज पुण्यातील आमदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. तातडीने ही कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर दंडासाठी नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी नागरिकांना दंडाचे चलन त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठविण्याचे आदेश दिले. 

ज्याप्रमाणे नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेटवर कारवाई केली जात आहे त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून `सीसीटीव्ही` च्या साह्यानं कारवाई करावी. उगाच नागरिकांना वेठीस धरू नये.  नागरिकांना चलन त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाहनचालकाने हेल्मेट घातले नसेल त्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर  कारवाई केली जाते. सुमारे 50 कोटी रूपयांचा दंड त्यासाठी भरावा लागल्याने त्याविरोधात पुणेकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात अधिवेशनामध्ये पुणेकरांची बाजू मांडावी, अशी मागणी हेल्मेट शक्ती विरोधी कृती समितीने ही देखील केली होती.

त्या पार्श्वभूमीवर आज आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हेल्मेटसक्तीसाठीच्या कारवाईला तातडीने स्थगिती द्यावी,अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई शिथिल करणयाचे आदेश दिल्याचे वातावरण तयार झाले. हेल्मेटसक्ती कायम राहणार असून फक्त दंडवसुली रस्त्यावर होण्याऐवजी त्याचे चलन आता संबंधितांना पाठविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com