Heena Rabbani khaar wants peace with honour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

हीना रब्बानी खार आज म्हणतात, शांतता हवी आहे पण सन्मानपूर्वक !

सरकारनामा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

.

नवी दिल्ली :  पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार नरमल्या आहेत. काल मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्रमक भाषा वापरणाऱ्या हीना रब्बानी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये आम्हाला शांतता हवी आहे पण सन्मानपूर्वक, असा नरमाईचा सूर लावला आहे. 

 

 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांची एक ध्वनिचित्रफीत हीना रब्बानी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात, " चार दशकांपूर्वीचे पण आजही समर्पक ठरणारे भुट्टो यांचे विधान आहे, आम्हाला शांतता हवी आहे पण सन्मानपूर्वक.'' 

आज केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये त्या असे म्हणतात, " या संघर्षाच्या काळात आपल्याला आपल्या ध्येयाच्या विसर पडायला नको. आपल्याला बदला नकोय. आपल्याला आपले सार्वभौमत्व आणि भौगोलिक सीमांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे आणि आपली ती जबाबदारी देखील आहे. म्हणून आम्हाला युद्ध नकोय पण आम्हाला सन्मानपूर्वक शांतता हवी आहे.'' 

संबंधित लेख