heena gavit attack maratha kranti morcha shame | Sarkarnama

हीना गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता; मराठा क्रांती मोर्चा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई : भाजपच्या खासदार हीना गावीत यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चीतच निंदनीय असून यामागे हेतुपरस्पर गावीत यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता असे क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, धुळेच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाने रविवारी जिल्हा नियोजनाची बैठक होती. 

या बैठकीनतर लोकप्रतिनिधी मोर्चेकऱ्यांना सामोरे जातील अशी आशा होती. पण, खासदार गावीत यांना लवकर निघायचे असल्याने त्यांना मागच्या दरवाजातून पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना कोण जाणार आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे, मागील दरवाजा तोडून आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसले व समोरच्या गाडीवर चढले. 

ज्या वेळी गाडीमधे खासदार गावीत आहेत हे लक्षात आले त्याक्षणी अनेकांनी शांततेचे आवाहन करत, गावीत यांना सुरक्षित बाहेर काढले. तिथल्या समन्वयकांनी गावीत यांची जाहीर माफी मागितली. अनावधानाने हा प्रकार घडल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे, हा प्रकार संतप्त भावना व अनावधानाने घडलेला असला तरी मराठा क्रांती मोर्चा खासदार हीना गावीत यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराचा निषेध करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

संबंधित लेख