मराठा आरक्षणप्रश्नी २९ जून रोजी पुण्यात सुनावणी

मराठा आरक्षणप्रश्नी २९ जून रोजी पुण्यात सुनावणी

पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या २९ जून २०१८ रोजी सुनावणी होणार आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे.

याबाबत संबंधितांनी आय़ोगाकडे आपली मते कळवावीत, असे आवाहन शिवसह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. 

याबाबत त्यांनी सांगितले की मराठा आरक्षणाचा आयोगाकडील विषय आता अंतिम टप्प्यात अाहे. त्यासाठी आयोगाकडे खालील मु्द्यांच्या आधारे माहिती कळवावी. 

१ ) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घटनात्मक तरतुदी , न्यायालयीन निवाडे ,केंद्रीय मागासवर्ग आयोग , राज्य मागासवर्ग आयोग , esbc आरक्षण या अनुषंगाने निर्माण झालेली  सर्वंकष  परिस्थिती त्यातून त्यावर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना सुचविणे 

२) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक मागासलेपण कसे सिद्ध करणार याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

३) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक  मागासलेपण कसे सिद्ध करणार याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

४ ) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आर्थिक  मागासलेपण कसे सिद्ध करणार याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

६) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नेमकी कोणकोणत्या विषयांची कोणती आकडेवारी  आवश्यक आहे  याची मांडणी व  मसुद्याची जबाबदारी 

७) मराठा शेतकरी व त्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण व त्या अनुषंगाने आकडेवारी व विविध रिपोर्टचे संदर्भ याची मांडणी व  मसुद्याची जबाबदारी 

८) मराठा  अंगमेहनती कष्टकरी  महिला
व त्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण व त्या अनुषंगाने आकडेवारी व विविध रिपोर्टचे संदर्भ याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

९) मराठा विद्यार्थी व त्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण व त्या अनुषंगाने आकडेवारी व विविध रिपोर्टचे संदर्भ याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

९) मराठा कष्टकरी , हमाल , रिक्षावाले , माथाडी , सुरक्षारक्षक , असे अंगमेहनती , खालची काम करणारे घटक  व त्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण व त्या अनुषंगाने आकडेवारी व विविध रिपोर्टचे संदर्भ याची मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

१० ) शासकीय निमशासकीय संस्था , इन्स्टिटयूट अशा मधील मराठा घटते प्रतिनिधीत्व याची आकडेवारी मांडणी व मसुद्याची जबाबदारी 

११) मराठा व कुणबी  म्हणजे  काय ?  समूहाची नेमकी लोकसंख्या याची आकडेवारी मांडणी व मसुद्याची जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com