Head masters transfer issue in ministrer s court? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

एका मुख्याध्यापकाच्या बदलीचा प्रश्न  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या "कोर्टा'त 

भरत पचंगे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

वाबळेवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे नाव जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदली यादीत नाव आल्याने ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. ही बदली रद्द होण्यासाठी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाइन पोर्टल "आपले सरकार' यावर निवेदन दिले आहे. तसेच याबाबत ग्रामविकासमंत्र्यांचीही भेट ग्रामस्थ घेणार आहेत.

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या बदलीचा प्रश्‍न आता राज्य स्तरावर जाऊन पोचला आहे. विविध उपक्रमांसाठी येथील शाळा प्रसिद्ध आहे. या उपक्रमांसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांची बदली रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना साकडे घालण्यात आले आहे. 

या शाळेत सध्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांना पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आवश्‍यक आहे. त्यामुळे आहे त्या शिक्षकांना तोपर्यंत येथेच नियुक्ती राहावी, अशी ग्रामस्थांचीही मागणी आहे. याबाबत आपण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना ही बाब सांगितली असून त्यांचेशी वाबळेवाडी ग्रामस्थांची बैठक घेण्याचाही निर्णय झाल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. 

वाबळेवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे नाव जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदली यादीत नाव आल्याने ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. ही बदली रद्द होण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाइन पोर्टल "आपले सरकार' यावर निवेदन दिले आहे. 

याबाबत स्थानिक बाबुराव पाचर्णे यांच्याकडेही हे निवेदन आले. त्यांनी सांगितले की ग्रामस्थांची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे पाठविली असून त्यांच्याशी बोलणेही झाले आहे. वाबळेवाडीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांना पूर्ण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी आवश्‍यक आहे. त्यासाठी तेथील सर्व शिक्षक वर्षभर कुठेही जाणार नाहीत व नवीन आणखी दोन शिक्षक तिथे देण्याबाबत आपणही ग्रामविकास मंत्र्यांशी बोलणार आहोत. या प्रकरणी मुंडे यांच्यासमवेत वाबळेवाडीकरांची बैठक घेण्याचेही निश्‍चित झाल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. त्या मुंबईत आल्याबरोबर ग्रामस्थांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. 
 

 
 

संबंधित लेख