दीड कोटीच्या लाचप्रकरणी भूमी अभिलेखचे वानखेडेंचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

दीड कोटीच्या लाचप्रकरणी भूमी अभिलेखचे वानखेडेंचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

पुणे : वकिलामार्फत एक कोटी 70 लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले पुणे विभागाचे निलंबित भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. चार फेब्रुवारीला अटकपूर्व जामीन फेटाळूनदेखील वानखेडे पोलिसांना सापडत नाहीत याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

वानखेडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने या पूर्वी फेटाळला आहे. या प्रकरणात ऍड. रोहित शेंडे याला 26 डिसेंबर 2018 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. वानखेडेंच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारल्याचे ऍड. शेंडे याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानंतर 4 जानेवारी रोजी वानखेडे देखील या गुन्ह्यात आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. वानखेडे आणि ऍड. शेंडे यांच्यात 600 हून अधिक फोन झाले आहेत. त्यावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. ऍड. शेंडे आणि तक्रारदार यांच्यात सुमारे 150 कॉल झाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले असल्याने त्यांच्याकडे तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे वानखेंडेचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती.

या बाबत "एसीबी'चे उपअधीक्षक दत्तात्रेय भापकर म्हणाले, ""वानखेडेंचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यांनी अद्यापपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे त्यांचा कसून शोध सुरू आहे. त्यांचे मोबाईल लोकेशनही तपासण्यात येत आहे. त्यांची माहिती मिळाल्यास त्वरित अटक करू.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com